हिंदू कायद्यान्‍वये मालमत्तांचे वर्ग II Classes of property under Hindu law.

 हिंदू कायद्यान्‍वये मालमत्तांचे प्रकार

1} संयुक्त कुटुंबाची मालमत्ता किवा सहदायात मालमत्ता(Joint-family property or coparcenary property)
2} स्वतंत्र मालमत्ता किंवा स्वकष्‍टार्जित मालमत्ता (Separate property or self-acquired property)

1} संयुक्त कुटुंबाची मालमत्ता किवा सहदायात मालमत्ता(Joint-family property or coparcenary property)¡  अशा मालमत्तेमध्‍ये सर्व सहदायादांची सामुदायीक मालकी आणि सामुदायीक ताबा असतो

¡  अशा मालमत्तेमध्ये खालील मालमत्तांचा समावेश होतो-

¡  (अ) वडिलोपार्जित मालमत्ता

¡  (ब) संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे संपादन केलेली मालमत्ता

¡  (क) "संयुक्‍त कुटुंबाच्‍या मालमत्तेत संम्‍मिलीत केलेली एखाद्‍या सदस्याची स्वतंत्र मालमत्ता" 

¡  (ड) संयुक्त कुटुंबाच्‍या निधीच्या सहाय्याने सर्व किंवा कोणत्याही सहदायदाने संपादित केलेली मालमत्ता

वडिलोपार्जित मालमत्ता 

(अ  'वडिलोपार्जित मालमत्ताहे संयुक्त कुटुंबाच्‍या मालमत्तेची विशिष्टता असते. 'वडिलोपार्जित मालमत्ताया शब्दाचा अर्थ असा कीजी मालमत्ता वडीलआजोबा आणि पणजोबा यांच्‍यापासून प्राप्‍त होते. या मालमत्तेत एखाद्या व्यक्तीच्या वंशजांच्‍या तीन पिढ्या असतात. म्हणजे अशा मालमत्तेत मुले, मुलांची मुले, मुलांच्‍या मुलांची मुले यांचा जन्‍मसिध्‍द अधिकार असतो.

(आ) वडिलोपार्जित मालमत्ता फक्‍त लगतच्‍या तीन पितृ पिढ्‍यांपुरतीच  मर्यादित असते. आणि आपल्या आईच्‍या वडीलांकडून मिळालेली मालमत्ता ही वारसदाराची स्‍वतंत्र मालमत्ता असते ज्यामध्ये त्याच्‍या मुलांना कोणताही जन्‍मसिध्‍द अधिकार प्राप्त होत नाही.

(इ)     कोणत्‍याही व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या स्‍त्री नातेवाईकांकडून मिळालेल्‍या कोणत्‍याही मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता म्‍हणता येणार नाही.

(ई)     भावाकडून बहिणीला भेट मिळालेली मालमत्ताबहिणीच्या मृत्युनंतर तिच्या मुलाला वारसाधिकाराने मिळेल आणि अशी मालमत्ता त्‍या मुलाची स्वतंत्र मालमत्ता असेल त्‍याला वडिलोपार्जित मालमत्ता म्‍हणता येणार नाही.

(उ)     कोणतीही मालमत्ता विभाजन होण्याच्या दिवसापर्यंत संयुक्त कुटुंबाचीच मालमत्ता मानली जाईल. विभाजनानंतर भावांनी मिळवलेली मालमत्ता संयुक्त कुटुंब मालमत्ता म्हणून मानली जाणार नाही.

(ब) संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे संपादन केलेली मालमत्ता

¡  ज्‍यावेळी संयुक्त हिंदू कुटुंबातील मालमत्ता एकत्रित करून व्यवसाय केला जातो किंवा संयुक्त कुटुंब मालमत्तेच्या सहाय्याने व्यवसायात संपत्ती मिळविली जातेती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता बनते.

¡  मुंबई उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसारसंयुक्त कुटुंबाच्‍या निधीच्या मदतीशिवायसंयुक्त कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्त श्रमांव्‍दारे मिळविलेली मालमत्ता ही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असल्याचे मानले जाईल.

((क)   संयुक्‍त कुटुंबाच्‍या मालमत्तेत संम्‍मिलीत केलेली एखाद्‍या सदस्याची स्वतंत्र मालमत्ता" 

जेव्‍हा कोणताही सहदायाद  त्याची स्वकष्‍टार्जित संपत्ती  संयुक्त कुटुंबाच्‍या संयुक्त निधीमध्ये सर्व स्वतंत्र दाव्यांना सोडून देण्याच्या हेतूनेस्वेच्छेने सम्‍मिलीत करेल तर ती मालमत्ता संयुक्त मालमत्ता बनेल.

अशा प्रकारे सम्‍मिलीत करण्‍याची कृती एकतर्फी असते. जेव्हा संयुक्त कुटुंबातील सदस्य आपली मालमत्ता संयुक्त कुटुंबातील मालमत्तांमध्ये सम्‍मिलीत करतो तेव्हा तो ती भेट देत नाही. यात कोणी दाता नसतो किंवा ज्याला बक्षीसदेणगी मिळते ती व्यक्ती  नसतो आणि यासाठी मालमत्ता हस्तांतरण कायद्याची तरतूद लागू होत नाही.

एकदा एकत्रितपणे असे समजले गेले की कुटुंब संयुक्त आहे आणि ते संयुक्त मालमत्ता धारण करतात तर असा कायदेशीर तर्क निर्माण होतो की, त्‍या संयुक्‍त कुटुंबातील स्वतंत्र सदस्याने किंवा सर्व सदस्यांनी घेतलेली मालमत्ता ही एकत्रित मालमत्ता आहे. जर एखाद्या सदस्याने संयुक्त मालमत्तेच्या विशिष्ट भागावर आपला स्वतंत्र हक्क असल्याचा दावा केला तर ती त्‍याची स्वतंत्र मालमत्ता असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुराव्याचा भार त्याच्यावर असेल.

(ड) संयुक्त कुटुंबाच्‍या निधीच्या सहाय्याने सर्व किंवा कोणत्याही सहदायदाने संपादित केलेली मालमत्ता

¡  संयुक्त कुटुंबाच्‍या मालमत्तेच्या सहाय्याने आणि मदतीने मिळविलेली मालमत्ता देखील संयुक्त मालमत्ता ठरते. अशा प्रकारेएकत्रित कुटुंबातील मालमत्तेची मालमत्ताम्हणजे भाडेइत्यादीअशा उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ताविक्रीची रक्कम किंवा अशा मालमत्तेची गहाणखत आणि अशा रकमेतून खरेदी केलेली मालमत्ता देखील संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असेल.

¡  संयुक्त हिंदू कुटुंबात काही सदस्यांच्या नावावर काही मालमत्ता खरेदी केली जातेतेव्हा ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता म्हणून ओळखली जाईल त्‍याची स्वतःची स्वतंत्र मालमत्ता नाही. संयुक्त कुटुंबातील मालमत्तेच्या मदतीशिवाय कोणतीही मालमत्ता मिळविली असल्‍यास ती स्वतंत्र मालमत्ता मानली जाऊ शकेल.

¡  जेव्‍हा संयुक्त कुटुंबाचा कर्ता त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता विकत घेतो तेव्‍हा त्‍याने अशी मालमत्ता स्वत:च्या स्वतंत्र मालमत्तेद्वारे खरेदी केली असे त्‍याला पुराव्‍यांसह सिध्‍द करावे लागेल. अशा पुराव्याच्या अनुपस्थितीतअसे समजले जाईल की अशी मालमत्ता त्‍याने संयुक्त कुटुंबाच्‍या मालमत्तेतून विकत घेतली आहे आणि ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता म्हणून ओळखली जाईल

 

२. स्‍वतंत्र किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता  

जी मालमत्ता संयुक्त  नसते तीला स्वतंत्र किंवा स्व-कष्‍टार्जित  मालमत्ता म्हणतात. 'स्व-कष्‍टार्जितहा शब्द असे सुचवितो की, ती मालमत्ता अशा प्रकारे संपादन करण्‍यात आली आहे की त्‍यावर त्‍या व्‍यक्‍तीशिवाय अन्‍य कोणाचाही अधिकार नाही.

हिंदू व्‍यक्‍तीने खालीलपैकी कोणत्याही मार्गाने संपादन केलेली मालमत्ता ही, तो एका संयुक्त हिंदू कुटुंबाचा सदस्य असूनही त्‍याची स्‍वतंत्र किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता असते: -(१) एका हिंदू व्‍यक्‍तीने स्वत:च्या प्रयत्नांद्वारे मिळवलेली मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल कारण संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांच्‍या संयुक्त श्रमांशिवाय आणि संयुक्त कुटुंब मालमत्तेस नुकसान न करता ती प्राप्त केलेली असते.

(२) जेव्‍हा एखादी व्यक्ती प्रतिकूल ताब्‍याने (adverse possession) मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्‍याची स्‍वतंत्र किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता आहे असे मानले जाईल.  

(३) जेव्‍हा संयुक्त कुटुंबातील सदस्य त्‍याचा स्‍वतंत्र  व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवतो आणि मालमत्ता खरेदी करतो तेव्‍हा त्‍याने मिळविलेले सर्व उत्पन्न आणि मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल.

मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने मकलियन सिंग वि. कुलवंत सिंग  या प्रकरणात असे निरीक्षण नोंदविले आहे की,

संयुक्त हिंदू कुटुंबातील एका पुरुष सदस्याने स्वत:च्या पगाराच्या उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल तर अशी मालमत्ता त्‍याची स्वत:ची संपत्ती आहे. अशा मालमत्तेत उत्तराधिकाराने त्‍याच्‍या वारसदारांना वारसा मिळेल. अशा मालमत्तेला संयुक्त हिंदू कुटुंबाची मालमत्ता म्हणता येणार नाही.

(४) एखाद्या व्‍यक्‍तीला त्‍याचे वडील, आजोबा, पणजोबा यांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेली मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल. जेव्हा एखादी व्यक्ती परंपरागत पुजेसारख्या अनुवांशिक व्यवसायातून पैशांची कमाई करते तेव्हा ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल, त्याच्या संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या रूपात मानली जाणार नाही.मदनलाल फुलचंद जैन वि. महाराष्ट्र राज्य  या प्रकरणात मा. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की,हिंदू व्‍यक्‍ती एकावेळेस स्वतंत्र मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ताही धारण करू शकतो.संयुक्त कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्याच्या काकाकडून (uncle) मिळालेली जमीन त्‍याची स्‍वतंत्र मालमत्ता असेल. त्‍या जमिनीची मनाप्रमाणे विल्‍हेवाट लावण्‍याचा त्‍याला पूर्ण अधिकार आहे.अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला भाऊकाका इत्यादीसारख्या दुय्‍यम नातेवाईकांकडून मिळालेली मालमत्ता स्‍वतंत्र मालमत्ता असेल ती वडिलोपार्जित मानली जाऊ शकत नाही.

(५) संयुक्त हिंदू कुटुंबाच्या विभाजनाचा भाग म्हणून हिंदू व्‍यक्‍तीने मिळविलेली कोणतेही मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल. जेव्‍हा एखादी हिंदू व्‍यक्‍ती, संयुक्त कुटुंबातील मालमत्तेत त्याला मिळालेल्‍या हिश्‍शाच्‍या आधारे काही मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

(६) एकमेव हयात वारस म्‍हणून वारसाहक्‍काने मिळालेली मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (७) एखाद्‍या हिंदू व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या वडिलांनीआजोबांनी, पणजोबांनी भेट म्‍हणून दिलेली मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता असेल. तथापि, अशी भेट त्‍याच्‍या कुटुंबाच्या फायद्यासाठी (benefit) दिलेली नसावी.

(८) पित्याद्वारे, पितृ मालमत्तेतून स्‍नेहाने दिलेल्या भेटवस्तू किंवा मालमत्ता ही त्‍या मुलाची स्वतंत्र मालमत्ता असेल.

 (९) शासनाकडून अनुदान म्‍हणून मिळालेली संपत्ती स्‍वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (१०) संयुक्त कुटुंबाची असलेली परंतु संयुक्त कुटुंबाने गमावलेली मालमत्ता, नंतर त्‍या संयुक्त कुटुंबाच्‍या एखाद्‍या सदस्याने, संयुक्त निधीच्या मदतीशिवाय पुनर्प्राप्त केली तर ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

(११) शिक्षणाद्वारे किंवा व्‍यवसायाव्‍दारे किंवा तज्ञ किंवा विशेष बुद्धिमत्तेद्वारे एकत्रित संयुक्त कुटुंबातील सदस्याने मिळविलेले कोणतेही उत्पन्न त्याची स्वतंत्र मालमत्ता मानले जाईल.जिथे संयुक्त कुटुंबातील सदस्य, संयुक्त कुटुंबाच्‍या निधीच्या आधारे शिक्षण घेतल्यानंतर काही ज्ञान किंवा कौशल्य प्राप्त करतात आणि नंतर त्यातून त्‍यांना मोठी रक्कम प्राप्‍त होतेमग ती रक्कम त्यांची स्वतंत्र मालमत्ता मानावी किंवा संयुक्त कुटुंबातील मालमत्ता मानावी हा विवादास्पद मुद्दा बनला होता.

 के.एस. सुभ्‍भई पिल्लई वि. आयकर आयुक्त  या प्रकरणात न्‍यायाधिकरणाने असा निर्णय दिला होता की, संयुक्त हिंदू कुटुंबाच्या कर्ताला मिळणारे पारिश्रमिक त्याची वैयक्तिक पात्रता आणि परिश्रमांमुळे मिळते, संयुक्त कुटुंबाने केलेल्‍या फंडांच्या गुंतवणूकीमुळे नाही. त्‍यामुळे असे पारिश्रमिक संयुक्त हिंदू कुटुंबाची उत्पत्ती म्हणून मानता येणार नाही.याबाबत न्यायाधिकरणाच्‍या निकालाला मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने पुष्‍टी दिली आहे.
No comments:

Post a Comment

कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : आजरोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जा...