pik vima latest news// पिक विमा 8 दिवसात शेतकऱ्याच्या बँकेत जमा करा असा आदेश सरकारने दिला आहे.

*प्रधानमंत्री पीक विमा योजना: नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात जमा करण्याचे निर्देश*
मुंबई, दि. 23: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. खरीप 2017 मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत अपर मुख्य सचिवांनी निर्देश दिले.
दोन आठवड्यांपूर्वी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत आढावा  बैठक घेतली होती, त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी अपर मुख्य सचिवांनी पाचही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधिंची बैठक घेतली. 
विम्या कंपन्यांना पीक उत्पादकतेविषयी सर्व आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी. बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यांबाबत ताळमेळ घालून रक्कम वितरीत केली जात असल्याचे विमा कंपन्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. 
आपले सरकार केंद्रावरून नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार जोडणी करण्यात आली आहे. अशा खात्यांचे ताळमेळ करताना जास्त वेळ लावू नका त्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करा अशा स्पष्ट सूचना अपर मुख्य सचिवांनी केल्या आहेत. खरीप 2017 मध्ये सुमारे 81 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यातील सुमारे 8 लाख शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. या आठवड्यातच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असेही श्री. विजयकुमार यांनी सांगितले. 
बैठकीस ओरिएंटल इन्श्युरन्स, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स, अग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कंपनी, रिलायन्स जनरल या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तुमचे आधार कार्ड कोणी वापरत तर नाही ना ? हे कसे पहाल II how to know where misused my Adhar ID

तुमचे आधार कार्ड कोण दुसरे वापरत तर नाही न हे कसे पहाल
सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाइल किवा pc वरती Google ओपेन करा आणी त्यामध्ये UIDAI टाईप  करा.
त्यानंतर तुम्ही वेबसाईट वर क्लिक करा आणी वेबसाईट ओपन झाल्यावर Aadhaar Authentication History
या वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणी साईडला असलेला कोड पण टाकाआणी GenerateOTP वर क्लिक करा.
त्यानंतरतुमच्या मोबाईल वर १ OTP येईल आणी त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेल्या डाटाची तारीख निवडा आणी otp दाखल करा.
त्यानंतर तुमचे आधार कार्ड कुटे कुटे वापरले गेले आहे ती हिस्ट्री तुमच्या समोर असेल.


कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : आजरोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जा...